नेहमीच वादांच्या भोवऱ्यात राहिलेल्या 'बिग बॉस' या रिअॅलिटी शो ची दरवर्षी चर्चा असते. 'बिग बॉस'च्या अकराव्या पर्वाचे विजेतेपद शिल्पा शिंदेने पटकावले. टीव्ही जगताची लाडकी बहु हिना खान आणि लाडकी भाभी शिल्पा शिंदे यांच्यात झालेली या पर्वातील टक्कर चांगलीच गाजली. बिग बॉस'च्या विजेतेपदावर एक-दीड हजार कोटींचा सट्टा लागल्याच्या बातम्या होत्या. हिना खान, शिल्पा शिंदे, विकास गुप्ता व मुनिश या चौघांपैकी कोण 'बिग बॉस'ची ट्रॉपी पटकावणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हिना आणि शिल्पा यांच्यामध्येच खरी टक्कर असल्याचे 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांचे मत होते. शेवटच्या दिवसांत शिल्पाने हिनावर 'चौराहेवाली आंटी' अशी कमेंट केल्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांतच नव्हे तर सोशल मीडियावरही चर्वितचर्वण झाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews